
समाजसेवेत आपल्या अतुलनीय योगदानासाठी संघमित्रा गायकवाड यांना सलग विविध मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध सहारा स्टार हॉटेलमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांच्या हस्ते संघमित्रा ताईंना “शक्तिमान भारत अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.
याच गौरवाची पुढची कडी अंधेरी येथील मेयर हॉलमध्ये पाहायला मिळाली, जिथे प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती जिंग्यानी यांच्या हस्ते त्यांना आणखी एक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याशिवाय, येत्या २९ एप्रिल रोजी पुणे येथे होणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात देखील संघमित्रा गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या दादासाहेब फाळके फॅशन अवॉर्डमध्येही प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत.
संघमित्रा गायकवाड यांची ही गौरवयात्रा समाजसेवेच्या त्यांच्या अपार मेहनतीचा, निष्ठेचा आणि लोककल्याणाच्या कार्याचा भक्कम पुरावा आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे आजचा काळ निश्चितच उजळून निघत आहे.
संघमित्रा गायकवाड — समाजसेवेची नवी शिदोरी, सन्मानांनी भरलेली तेजस्वी वाटचाल!
समाजसेवेतल्या उल्लेखनीय कार्यासाठी संघमित्रा गायकवाड यांचा सन्मान; शक्तिमान भारत पुरस्कार ते दादासाहेब फाळके फॅशन अवॉर्डपर्यंत गौरवाची घोडदौड